Home नाशिक …म्हणून बाळासाहेब थोरात अडचणीत आले

…म्हणून बाळासाहेब थोरात अडचणीत आले

Nashik graduate constituency election, Satyajeet Tambe:  आपलं कुटूंब मजबूत असेल तर घर फुटत नाही. काँग्रेसमध्ये काय झालं अजून कळाले नाही.

So Balasaheb Thorat got into a lot of trouble

नाशिक: नाशिक पदवीधर निवडणुकीत सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही, हे पक्षासाठी आणि त्यांच्यासाठी वाईट झालंय, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलंय. त्याचसोबत, काँग्रेसचे नेते अडचणीत आल्याचंही मोठं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय.

सत्यजीत तांबेंना उमेदवारी द्यावी असे सांगितले असते तर दिले असते. उमेदवारी घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही हे अतिशय वाईट झाले. यामुळे बाळासाहेब थोरात अडचणीत आले. शिवाय भाजपाचा पाठिंबा तांबे यांना मिळेल अस वाटत आहे. राजकारणात अशा गोष्टी होत असतात, पण आपलं कुटूंब मजबूत असेल तर घर फुटत नाही. काँग्रेसमध्ये काय झालं अजून कळाले नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर आज छगन भुजबळ यांनी मौन सोडले. नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी तांबे कुटुंबाच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, डॉ. सुधीर तांबे दोन ते तीन वेळा आमदार झाले असून त्यांच्या बद्दल माझ्या मनात चांगल्या भावना आहेत. तांबे माझ्याकडे आले होते, त्यावेळी मी त्यांना पाठिंबा देतो असे सांगितले. गेल्या तीन वेळा आमदार असल्याने त्यांच्याबद्दल नागरिकांच्या देखील चांगल्या भावना आहेत. पण त्यांनी अचानक अस का केले, हे मला देखील कळाले नाही. शिवाय भाजपाचा पाठिंबा तांबे यांना मिळेल अस वाटत आहे. राजकारणात अशा गोष्टी होत असतात, पण आपलं कुटूंब मजबूत असेल तर घर फुटत नाही. काँग्रेसमध्ये काय झालं अजून कळाले नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.

Web Title: So Balasaheb Thorat got into a lot of trouble

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here