संगमनेरच्या तरुणांकडून गांजाची तस्करी, संगमनेरच्या दोघांना अटक
Breaking News | Sangamner: अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करणाऱ्या टोळीला पोलीसांनी जेरबंद केले असून ४ किलो २० ग्रॅम वजनाचा गांजा, होण्डा सिव्हीक कारसह ८ लाख ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला संगमनेरचे आरोपी ताब्यात.
सिन्नर: सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करणाऱ्या टोळीला पोलीसांनी जेरबंद केले असून ४ किलो २० ग्रॅम वजनाचा गांजा, होण्डा सिव्हीक कारसह ८ लाख ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच मालेगावच्या आझादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांना कारमध्ये गांजाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे शुक्रवारी (दि.१६) नाशिक ते पुणे महामार्गावरील हॉटेल न्यु वैष्णवीच्या समोर सापळा पोलिसांनी सापळा रचनला. सिल्व्हर रंगाची होण्डा सिव्हीक कार क्र. एम. एच. ०१/ई.सी.५७४८ हे वाहन ताब्यात घेतले. प्रथमेश पोपट राऊत (वय २५) रा. घुलेवाडी, संगमनेर, शिवाजी गोरख सातपुते (वय २७) रा. साईनगर, नेहरू चौक, संगमनेर यांनाही ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यात असलेला ८२ हजार रुपये किंमतीचा ४ किलो २० ग्रॅम वजनाचा गांजा व होण्डा सिव्हीक कार असा एकुण ८,३०,४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महत्वाचे: नवनवीन फिचर मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा.
मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करण्याचा उद्देशाने असल्याने सिन्नर पोलिसांत एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २० (ब), । (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Breaking News: Smuggling of ganja among the youth of Sangamnercha, both of them stuck