संगमनेरात कत्तलखाणे सुरूच! १४ जनावरांची सुटका
Breaking News | Sangamner: कत्तलीच्या इराद्याने बांधून ठेवलेल्या १२ गाई व दोन वासरांना पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवदान.
संगमनेर: संगमनेरातील कत्तलखाने आजही सुरूच असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. कालच कत्तलीच्या इराद्याने बांधून ठेवलेल्या १२ गाई व दोन वासरांना पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. पोलिसांनी शहरातील मदिना नगर परिसरातमध्ये सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कारवाई करून १४ जनावरांची मुक्तता केली.
संगमनेर शहरातील मदिना नगर परिसरातील एका काटवनामध्ये कत्तलीसाठी गोवंश जातीचे जनावरे बांधून ठेवल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना खबऱ्याकडून समजली. त्यांनी त्वरित आपल्या सहकाऱ्यांना याबाबतची माहिती देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर पोलिस पथकाने मदिना नगर परिसरात जाऊन पाहणे केली. या ठिकाणी पोलिसांना १४ काळ्या पांढऱ्या रंगाच्या गोवंश जातीची जीवंत जनावरे व वासरे बांधून ठेवलेली दिसली, जनावरांच्या मालकांबाबत परिसरात चौकशी केली असता ती अज्ञात आरोपीने कत्तल करण्यासाठी काटवनामध्ये बांधलेली समजले. असल्याचे पोलिसांनी या ठिकाणाहून १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या १२ काळ्या पांढऱ्या रंगाच्या गाई व १४ हजार रुपये किमतीचे दोन वासरे पोलिसांना दिसली. पोलिसांनी ही जनावरे मुक्त करून तालुक्यातील सायखिंडी येथील जीवदया गोशाळेत पाठवली. याबाबत पोलिस नाईक राहुल डोके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Slaughterhouse continues in Sangamner 14 Rescue of animals
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News