Home संगमनेर सहाव्या बाणाने घेतला वेध, विखेंच्या भात्यातील खास बाणाने थोरातांचा पराभव

सहाव्या बाणाने घेतला वेध, विखेंच्या भात्यातील खास बाणाने थोरातांचा पराभव

Sangamner Election: 1999 पासून थोरातांचा पराभव करण्याच्या आशेने शिवसेना लढत होती. विखेंच्या भात्यातील खास बाणाने थोरातांचा पराभव. (Shiv Sena)

sixth arrow took Vedha, defeating the Thorats with a special arrow from Vikhe's Sangamner Election

संगमनेर: महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यात संगमनेरात धक्कादायक पराभव झाला. अमोल खताळ या नवख्या उमेदवाराने त्यांचा तब्बल 12 हजार मतांनी पराभव केला. खताळ जायंट किलर ठरले. लोकसभेला डॉ. सुजय विखे पाटलांचा पराभव करण्यात मोठा वाटा असणाऱ्या थोरातांना त्यांच्याच संगमनेरात पराभवाची धूळ चारत विखे पाटलांनी त्या पराभवाची परतफेड केली. विखे पाटील यांनी थोरातांची दहशत अन् विकासाचा पुढे केलेला मुद्दा संगमनेरकरांना भावल्याची परिणती खताळ यांच्या विजयात झाली. संगमनेर हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून 1951 पासून आतापर्यंत तेथून काँग्रेस उमेदवाराचा सतत विजय झाला आहे.

1990 मध्ये वसंत गुंजाळ यांनी भाजपकडून बाळासाहेब थोरातांविरोधात निवडणूक लढविली होती. मात्र गुंजाळ यांचा 4862 मतांनी पराभव झाला होता. 1999 पासून थोरातांचा पराभव करण्याच्या आशेने शिवसेना लढत होती; मात्र सतत अपयश येत होते. बापूसाहेब गुळवे, संभाजी थोरात, बाबासाहेब कुटे, जनार्दन आहेर, साहेबराव नवले यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत थोरातांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तो फेल गेला. यंदा मात्र शिवसेनेचे अमोल खताळ यांनी थोरातांच्या विरोधात धनुष्य उचलले. विखेंच्या भात्यातील खास बाण त्यांना मिळाले. या बाणाच्या टोकाला ‘गणेश’पासून ‘नगर’ पर्यंतच्या पराभवांतून आलेला संयम, संगमनेरातील पाण्यापासून दुधापर्यंतच्या प्रश्नांची ताकद होती. परिणामी थोरातांचा राजकीय वेध घेण्यात त्या बाणाला यश मिळाले.

Web Title: sixth arrow took Vedha, defeating the Thorats with a special arrow from Vikhe’s Sangamner Election

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here