Home नागपूर नदीच्या पुरात स्कॉर्पियो गाडी गेली वाहून, सहा जणांचा जागीच मृत्यू

नदीच्या पुरात स्कॉर्पियो गाडी गेली वाहून, सहा जणांचा जागीच मृत्यू

Nagpur river flood बामनमारी नदीला मुसळधार पावसामुळे पूर, स्कॉर्पियो गाडी गेली वाहून तीन मृतदेह मिळाले आहेत. अजुनही तिघांचा शोध सुरू.

Six people were killed on the spot when a Scorpio car overturned in a river flood

नागपूर: नागपूर जिल्ह्याच्या केळवद येथील बामनमारी नदीला मुसळधार पावसामुळे पूर आलेला आहे. या नदीच्या पुरात स्कॉर्पियो गाडी वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गाडीत सहा जण असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे बामनमारी नदीला पूर आला आहे. पुलावरून पाणी असताना वाहन चालकाने गाडी पुढे काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी  पाण्याचा ओढा आल्याने गाडी नदीत वाहून गेली. यावेळी गाडीत सहाजण प्रवास करत होते. या सहाजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान शोध पथकाला तीन मृतदेह मिळाले आहेत. अजुनही तिघांचा शोध सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. तर नागपूरसह विदर्भात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज सकाळपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे बामनमारी नदीला पूर आला आहे.

Web Title: Six people were killed on the spot when a Scorpio car overturned in a river flood

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here