Home अहमदनगर ११० बनावट इन्शुरन्स पॉलिसी देऊन सहा लाखांची फसवणूक, महिलेला अटक

११० बनावट इन्शुरन्स पॉलिसी देऊन सहा लाखांची फसवणूक, महिलेला अटक

Six lakh fraudulently issued with 110 fake insurance policies, woman arrested

Ahmednagar |अहमदनगर: इन्शुरन्स पॉलिसी (insurance policies) देऊन एकूण ६ लाख १५ हजार  ६८४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे ११० इन्शुरन्स पॉलिसी देऊन फसवणूक करणाऱ्या महिलेस कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.

सिमरण नंदकुमार पाटोळे (वय 26 मुळ रा. वडगाव गुप्ता ता. नगर, हल्ली रा. चेतना कॉलनी, नागापूर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिला न्यायालयाने 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

वासन ब्रदर्स प्रा.लि. केडगाव येथे सिमरन पाटोळे हिने वाहनाचा इन्श्युरन्स उतरवण्याकरिता एकूण 110 ग्राहकांकडून जास्त रक्कम घेऊन प्रत्यक्षात शोरूममध्ये कमी रक्कमेचा भरणा केला. आय. डी. बी. मध्ये फेरबदल करून ग्राहकांना जास्त रक्कम भरल्याच्या फेरफार केलेल्या इन्श्युरन्स पॉलिसी देऊन एकूण सहा लाख 15 हजार 684 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सिमरण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनिश सुभाष आहुजा (वय 38 रा. तारकपूर) यांनी फिर्याद दिली होती. सन 2018 ते 1 जुलै, 2020 दरम्यान हा प्रकार घडला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून सिमरनपसार होती. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी सिमरन पाटोळे हिला अटक केली आहे.

Web Title: Six lakh fraudulently issued with 110 fake insurance policies, woman arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here