बहिणीचा मित्र घरात घुसला अन तोंड दाबून अत्याचार, धक्कादायक घटना!
Breaking News | Pune Crime: बहिणीचा मित्र असलेल्या तरुणाने घरात शिरून झोपलेल्या तरुणीवर बळजबरीने अत्याचार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे.
पुणे : बहिणीचा मित्र असलेल्या तरुणाने घरात शिरून झोपलेल्या तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विश्वास पारडे (२९, रा. गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार फिर्यादीच्या घरी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते चारच्या सुमारास घडला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वास पारडे हा फिर्यादीच्या बहिणीचा मित्र असल्याने त्यांच्यात ओळख होती. त्यामुळे तो फिर्यादीच्या घरी ये-जा करीत असे. फिर्यादी घरात झोपल्या असताना त्याने फिर्यादीचे तोंड दाबून जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. त्याच्या मित्राला फिर्यादी यांनी हा प्रकार सांगितला. त्याचा राग मनात धरून विश्वास पारडे याने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियंका निकम करत आहेत.
Web Title: Sister’s friend entered the house and Rape
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study