Home नगर संगमनेर: भावासाठी बहिणीने केले बालकाचे अपहरण

संगमनेर: भावासाठी बहिणीने केले बालकाचे अपहरण

Breaking news | Sangamner:  भावाला मुलगा मिळून देण्यासाठी अपहरणाचा फंडा.  गुन्ह्यात तिघे अटकेत, ११ महिन्यांच्या बालकांची सुटका.

sister kidnapped the child for her brother

नगर | संगमनेर: भावाला तीन मुली, त्याला मुलगा होत नसल्याने बहीणने गुन्हेगारीचे पाऊल उचलले. तिने भावाला मुलगा मिळून देण्यासाठी अपहरणाचा फंडा वापरला. पण, पोलिसांच्या तावडीतून काहीच सुटत हे सिद्ध झाले. भावासाठी नगर रेल्वे स्थानकावरून ११ महिन्याच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या बहिणीसह भाऊ व तिच्या पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि ११ महिन्यांच्या बालकाची गुंजाळवाडी (ता. संगमनेर) येथून सुटका केली. अनिल अशोक जाधव (वय ४१), शालन अनिल जाधव (वय ३८, दोघे रा. सुपा, ता. पारनेर, जि. नगर), नवनाथ विष्णू धोत्रे (वय ३३, रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर, नगर) असे आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी १६ जून २०२४ रोजी दुपारी अहमदनगर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील एटीएमववळ असलेल्या लिंबाच्या झाडाखालून अपहरण झालेल्या बालकाची आई (वय२३) यांच्याशी एका अनोळखी महिलेने जवळ येऊन ओळख बाढविली. पीडित आईजवळील ११ महिन्याच्या बाळाला जेवणाकरिता वरण भात घेऊन येते अशी बतावणी करून आरोपी महिलेने बाळास पळवून नेले. ती महिला परत बाळा घेऊन आली नाही. याबाबत बाळाची आईने लोहमार्ग पोलिस ठाण्यात दिलेल्या फियांदीवरून गुन्हा दाखल झाला होता. लोहमार्ग पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय लोणकर यांना गोपनीय माहिती मिळाली की वरील गुन्हा सुपे येथील एका दाम्पत्याने केला आहे. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी सुपा येथून जाधव दाम्पत्याला ताब्यात घेतले. त्यानंतर अपहरण झालेल्या मुलाबाबत विवारले असता त्यांनी तो मुलगा आरोपी शालन जाधव हिथा भाऊ नवनाथ धीत्रे याच्याकडे दिला असल्याचे सांगितले. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन चव्हाण यांना दिली. त्यांनी तत्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस पथक रवाना केले.

लोहमार्ग व संगमनेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत गुंजाळवाडी येथून आरोपी नवनाथ धोत्रे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ११ महिन्याच्या बालकाची सुटका केली. नवनाथ धोत्रे हा शालन जाधव हिचा भाऊ आहे. नवनाथला पहिल्या तीन मुली असून त्याला मुलगा होत नसल्याने मुलाचे अपहरण केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक संजय लोणकर, पोलिस हवालदार सर्फराज खान, बाबासाहेब गवळी, ईरफान शेख, रविंद्र देशमुख, अविनाश खरपास, आसाराम गेवले, किरण तोरडमल, प्रकाश गडाख, गोरक्ष नवले, बनिता समिदर, मंगल आहेर, होमगार्ड साबिर शेख, होमगार्ड मंदार सटाणकर व संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनल फडोळ, पोलिस हेडकॉन्स्टेबल गोविंद मोरे, राजू झोले, अशोक पारबी, पांडुरंग पटेकर, अजित कुन्हे, शितल बहिरट यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय लोणकर करीत आहेत.

Web Title: sister kidnapped the child for her brother

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here