शाळेतच शिक्षकाला हृद्यविकाराचा झटका आल्याने मृत्यू
सिन्नर | Sinnar News: सिन्नर तालुक्यातील सिन्नर येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे या विद्यालयातील एका शिक्षकास शाळेतच काम करीत असताना हृद्यविकाराचा झटका (Heart attack) आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शरद भागीरथ चतुर वय ५६ असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. सिन्नर येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे या विद्यालयातील शरद चतुर हे साडे सात वाजता नेहमीप्रमाणे शाळेत आले. काही वेळाने त्यांच्या छातीत दुखू लागल्याने सहकारी शिक्षकांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले मात्र तरी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Sinnar Teacher dies of heart attack at school