Home महाराष्ट्र अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन

Sindhutai Sapkal passed away

पुणे| Pune: सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे वयाचच्या 75 व्या वर्षी निधन (Sindhutai Sapkal passed away) झाले आहे.  पुणे येथे घेतला अखेरचा श्वास .

सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले.  त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात होते.

आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते.सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणत असे सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला.

Web Title: Sindhutai Sapkal passed away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here