संगमनेरात शुभांगी पाटलांना अधिका-यांनी हटकलं, हे काय ग्रामपंचायतीचं इलेक्शन नाही
Nashik Graduate Constituency Election : ही ग्रामपंचायत स्तरावरील निवडणुक नाही, बाहेर जाण्याच्या सूचना.
संगमनेर: महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडणुकीच्या कामासाठी तैनात असलेल्या अधिका-याने नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या कारणास्तव संगमनेर मतदान केंद्रांवर हटकलं.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी आज सोमवारी उत्साहात मतदान झाले. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात संपूर्ण दुपारी दोनपर्यंत 31.71 टक्के मतदान झाले आहे.
महाविकास आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या संगमनेर येथील मतदान केंद्रावर दुपारी पोहचल्या. त्या मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना निवडणूक अधिकाऱ्याने पाहिले. त्यामुळे अधिका-यांनी शुभांगी पाटील यांना तसे करण्यापासून रोखले. मतदान केंद्रात प्रचार करत असल्याचा आक्षेप घेत परिसरातून बाहेर जाण्याच्या सूचना केल्या.
त्यावेळी पाटील आणि मतदान केंद्र अधिकारी यांची चर्चा झाली. तुम्हांला काय आणि कसे सुरु आहे हे मी दाखवितो. तुम्ही बघा कक्षात जाऊन असे अधिकारी यांनी स्पष्ट केले. त्यावेळी त्यांनी माझ्यासोबत एक कार्यकर्ता येऊ द्या असे म्हणातच अधिका-यांनी त्यांना तुम्ही नियमांचा भंग करत आहात. ही ग्रामपंचायत स्तरावरील निवडणुक नाही असे सुनावले. त्यावर पाटील यांनी त्यांच्या सामोये हात जोडत बाहेरचा रस्ता धरला.
दरम्यान महाविकास आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील म्हणाल्या मला हात जोडायची सवय असून मला मतदान केंद्रात कोणीही रोखले नाही. मी स्वत:हून कामकाज पाहून बाहेर आले असा दावा देखील शुभांगी पाटील यांनी केला.
Web Title: Shubhangi Patil from Sangamaner is this, not a Gram Panchayat election
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App