Home संगमनेर शुभांगी पाटील संगमनेर येथील बाळासाहेब थोरातांच्या निवासस्थानी गेल्या पण गेटवरच….

शुभांगी पाटील संगमनेर येथील बाळासाहेब थोरातांच्या निवासस्थानी गेल्या पण गेटवरच….

Nashik graduate constituency election | Shubhangi Patil:  शुभांगी पाटील यांचे फटाके फोडून जल्लोषात स्वागत.

Shubhangi Patil at Balasaheb Thorat's residence at Sangamner

संगमनेर:  नाशिक पदवीधर मतदारसंघातील  महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर तालुक्यात निवडणुक प्रचारार्थ आल्या आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी शुभांगी पाटील यांचे फटाके फोडून जल्लोषात स्वागत केलं. शुभांगी पाटील यांनी सय्यदबाबा दर्ग्यावर शाल अर्पण करत आपल्या प्रचाराची सुरूवात केली.

दरम्यान, शुभांगी पाटील या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरातील निवासस्थानी पोहचल्या. बाळासाहेब थोरात हे उपचारार्थ मुंबईतील रुग्णालयात आहेत. त्यामुळे पाटील यांना थोरात यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशदारानजीक थांबवण्यात आले. त्यानंतर शुभांगी पाटील यांनी परतीचा मार्ग धरला.

मी केवळ शिवसेनेची नाही तर महाविकास आघाडीची उमेदवार आहे. नात्यागोत्यापेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणी कुठे गेले तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांचा मलाच आशिर्वाद व पाठिंबा मिळेल असा विश्वास नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्यानंतर आज शुभांगी पाटील यांनी संगमनेरातून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यांनी आज येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रचाराला सुरुवात केली यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, काँग्रेस पक्षाने विश्वास दाखवून व कोरा ए. बी. फॉर्म देऊनही सत्यजित तांबे यांनी पक्षाचा अधिकृत अर्ज भरला नाही. तसेच विरोधी पक्षाकडे पाठिंब्याची मागणी केली. त्यामुळे महाविकास आघाडीने त्यांना नाकारत या सशक्त महिला म्हणून माझ्यावर विश्वास दाखवत मला पाठिंबा जाहीर केला.

Web Title: Shubhangi Patil at Balasaheb Thorat’s residence at Sangamner

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here