Home श्रीरामपूर अहमदनगर जिल्ह्यात ह्या तालुक्यात एकाच दिवसात १०१ करोना पॉझिटिव्ह

अहमदनगर जिल्ह्यात ह्या तालुक्यात एकाच दिवसात १०१ करोना पॉझिटिव्ह

Shrirampur Taluka 101 corona positive

श्रीरामपूर | Shrirampur: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात सोमवारी एकाच  दिवशी तब्बल १०१ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात करोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिक व प्रशासन यांची चिंता वाढली आहे.

तालुक्यात एकूण करोनाबाधितांची संख्या १४३४ इतकी झाली आहे. बाबसाहेब आंबेडकर वसतिगृह कोव्हीड सेंटर येथे रॅपिड अॅटीजेन चाचणी करण्यात आली. यामध्ये ३७ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा शासकीय प्रयोगशाळेतून नऊ, खासगी प्रयोगशाळेतून ५८ अहवाल प्राप्त झाले असे एकूण १०१ करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  

तसेच शहरातील एका ५५ वर्षीय मुख्याध्यापकाचा करोनाने मृत्यू झाला आहे. उपचार सुरु असताना त्यांना श्वसनाचा अधिक त्रास होऊ लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील एकूण मृत्यूची संख्या ३१ इतकी झाली आहे.  

तालुक्यात ३१५० व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून यामध्ये एकूण १४३४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

See: Latest Entertainment News and Latest Marathi News

Web Title: Shrirampur Taluka 101 corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here