अहमदनगर:  शिक्षकाची विष प्राशन करून आत्महत्या

    Shrirampur Suicide by poisoning a teacher

    श्रीरामपूर | Shrirampur:  शहरातील गोंधवणी रोडवर राहणार्‍या एका प्राथमिक शाळेत शिकविणार्‍या शिक्षकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    संजय पिटर शेळके (वय 55) असे या शिक्षकाचे नाव असून ते संत तेरेजा हायस्कूल हरेगावच्या प्राथमिक शाळेत ते शिकवत असतात. शहरातील गोंधवणी रोडवरील गुरुनानक परिसरात  ते राहत होते.

    संजय शेळके यांनी काल सकाळी त्यांच्या राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांची पत्नीही शिक्षिका आहे. त्यांनी आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समजू शकले नाही.  संजय शेळके यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Web Title: Shrirampur Suicide by poisoning a teacher

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here