Home क्राईम लॉजवर छापा, पोलीस उपाधीक्षकांची कारवाई, तीन मुलींची सुटका

लॉजवर छापा, पोलीस उपाधीक्षकांची कारवाई, तीन मुलींची सुटका

Shrirampur Raid on the Panchshil lodge

श्रीरामपूर | Shrirampur: श्रीरामपूर शहरातील पंचशील लॉजवर अवैध देहव्यापार प्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप मिटके व त्यांच्या पथकाने छापा टाकत लॉज व्यवस्थापक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

याबबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील पंचशील लॉजवर देह व्यापार सुरु असल्याची माहिती मिळाली. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास वार्ड मंबर तीन येथील पंचशील लॉजवर पोलीस अधीक्षक संदीप मिटके व आय पी एस पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, पोलीस निरीक्षक मुकुंद खान त्यांच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी श्रीरामपूर येथील तीन मुली आढळून आल्या. या तीन मुलींची सुटका करण्यात आली. पोलीस नाईक अश्विनी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लॉज व्यवस्थापक गणेश खैरनार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Shrirampur Raid on the Panchshil lodge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here