एक चार चाकी संशयास्पद फिरत असल्याचे दिसले पोलिसांनी पाहिले अन
श्रीरामपूर | Shrirampur: कोरोना वाढता प्रदुर्भावाच्या पार्शभूमीवर संचारबंदी, रुग्णालय ऑक्सिजन, औषध, रुग्ण यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु असताना अनेकांचे अवैध धंदे सुरूच आहे. गांजाची वाहतूक आणि पुरवठा करणाऱ्याला श्रीरामपूर मध्ये बुधवारी पहाटे पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून साडे चार लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांना श्रीरामपुरातील देवकर परिसरात गांजाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यानी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप व पोलीस पथकासह त्याठिकाणी छापा घातला. तेथे एक चार चाकी संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आली. त्यामुळे पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना अधिक संशय आला. त्यांनी त्या वाहनाची तपासणी केली असता खोक्यांत निळ्या पिशव्यांमध्ये गांजा भरून ठेवल्याचे वाहनांत आढळून आले.
वाहन चालक गणेश भास्कर सरोदे वय ३८ देवकर वस्ती श्रीरामपूर यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४ लाख ६० रुपये किमतीचा ४६ किलो गांजा, चार लाख किमतीची चार चाकी गाडी असा एकूण ८ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
Web Title: Shrirampur four-wheeler was seen moving suspiciously