सापुताराला काढलेली सहल महागात १५ जण करोना पॉझिटिव्ह
श्रीरामपूर | Shrirampur: व्यापाऱ्यांचे चार कुटुंब सहलीला गेल्याने चांगलीच महागात पडली आहे. सहलीला गेलेले शहरातील १५ जणांना तर गुजरात येथे लग्नाला गेलेल्या तिघा जणांना करोनाची लागण झाली आहे.
रुग्ण संख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा उपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. शहरात एक महिन्यापासून करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. व्यापाऱ्याचे चार कुटुंब सापुतारा येथे सहलीला गेले होते. त्यातील सुमारे १५ जणांना करोनाची बाधा झाली आहे. तसेच एक कुटुंब गुजरात येथे लग्नाला गेल्याने त्यातील तिघांना करोनाची लागण झाली आहे. १६ जानेवारी पर्यंत करोनाचे रुग्ण थांबले होते. त्यांनतर रुग्ण वाढ सुरु झाली. एक महिन्यात ५० रुग्ण वाढले आहे. बाधितांची एकूण संख्या २६०० वर पोहोचली आहे तर तिघांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत ८० जणांचे करोनाने बळी घेतले आहे. करोना रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागल्याने बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील उपचार केंद्र पुन्हा सुरु करण्यात आले आहे.
Web Title: Shrirampur Expensive trip to Saputara 15 people positive Corona