Crime: श्रीरामपूर: आरटीओ अधिकार्यास मारहाण
Ahmednagar Crime | श्रीरामपूर | Shrirampur: ऑनलाईन नोंदणी न करताच तात्काळ कागदपत्रांची मागणी करुनही ती दिली नाही म्हणून शिरसगाव येथील दोघांनी श्रीरामपूर येथील परिवहन अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ आरटीओ अधिकार्यास शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातदोघांवर गुन्हा दाखल करण्यात येवून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
शिरसगाव येथील गणेश आमले व विजय जाधव हे दोन तरुण मोटारसायकलवरुन आले आणि बरेच दिवस झाले सगळी कागदपत्रांची पूर्तता केलेली असून आम्हाला आमची रजिस्टर नोंदणी करावी, अशी मागणी केली. त्यावर आरटीओ अधिकार्यांनी ऑनलाईन नोंदणी करा तुम्हाला तात्काळ तुमचे रजिस्ट्रेशन नोंदणी करतो असे सांगितले. मात्र हे दोेघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी त्या अधिकार्यास शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. यामुळे परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गणेश आमले व विजय जाधव या दोघांविरुध्द शिवीगाळ करुन मारहाण करणे व सरकारी कामात अडथळा आणणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे अधिक तपास करीत आहे.
Web Title: Shrirampur Crime RTO officer beaten