…म्हणून आरटीओ अधिकाऱ्याच्या अंगावर कार्यकर्त्यांनी शाई फेकली
Shrirampur | श्रीरामपूर: अहमदनगरच्या श्रीरामपूरमधील आरटीओ कार्यालयाच्या आवारात RTO अधिकाऱ्याच्या अंगावर RPI च्या कार्यकर्त्यांनी शाई फेकल्य़ाची घटना घडली आहे. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी नानासाहेब बच्छाव या आरटीओ अधिकाऱ्यांवर शाई फेकली आहे. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी आरटीओ कार्यालयात राडा देखील केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली नाही म्हणून गांधीगिरी मार्गाने सत्कार करून अंगावर शाई फेकून हा निषेध व्यक्त करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
१४ एप्रिल रोजी देशासह जगभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली होती. मात्र श्रीरामपूर येथील आरटीओ कार्यालयमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली नसल्याने आक्रमक झालेल्या RPI कार्यकर्त्यांनी RTO अधिकारी नानासाहेब बच्छाव यांच्यावरती शाई फेकली आहे.
या घटनेने तेथे एकच गोंधळ उडाला. येथील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना बाजूला नेले. अज्ञान कार्यकर्ते तेथून निघून गेले. या घटनेचा निषेध म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले. त्यानंतर घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली.
Web Title: Shrirampur Activists throw ink on RTO officer