वाळू तस्करांवर कारवाई: २ कोटीचा मुद्देमाल जप्त, पाच जण ताब्यात
श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून मातुलठाण येथे रात्रीच्या वेळी बेकायदा वाळू तस्करी होत होती. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या आदेशाने रविवारी रात्रीच्या सुमारास बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या तस्करांवर मातुलठाण येथे कारवाई करण्यात आली.
यावेळी या कारवाईत पोकलेन मशीन व जेसीबीसह सुमारे २ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे. यावेळी तालुका पोलिसानी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
रविवारो रात्री अडीच वाजेच्या सुमारास कारवाई करण्यात आली. सुनीलकुमार चुरामन (झारखंड), मनजित धुप्पड (नाशिक), अंजनीगौरीशंकर विश्वकर्मा (मध्यप्रदेश), युवराजसिंग केशरसिंग (डेहराडून ) व रवी धुप्पड (श्रीरामपूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्याकडून दोन पोकलेन, एक बुलडोझर, एक ट्रक, दोन जेसीबी व चार ब्रास वाळू, मोबाईल असा १ कोटी ८३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Web Title: Shrirampur Action against sand smugglers