लघवी करेपर्यंत तिघा भामट्यांनी केला ट्रक गायब, अहमदनगरची घटना
Ahmednagar | अहमदनगर | Shrigonda Crime: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून विचित्र घटना समोर आली आहे. एक ट्रकचालक रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून लघुशंका करण्यासाठी थांबला असता, काही भामट्यांनी क्षणात भलामोठा ट्रक गायब केल्याची घटना घडली आहे. पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओमधून आलेल्या तिघांनी हा ट्रक पळवून नेला आहे. या प्रकरणी ट्रकचालकाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहे,
ट्रकचालक मुकिंदा पाचपुते यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. भारत विष्णू धोत्रे (रा. उरळी कांचन, पुणे), नितीन शिवाजी दरेकर (रा. शिंदेवाडी, बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत यात आणखी एका अज्ञात व्यक्तीचा समावेश आहे.
फिर्यादी ट्रकचालक आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा परिसरातून जात होते. दरम्यान त्यांना लघुशंका आली. यामुळे त्यांनी संबंधित ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला आणि लघवी करण्यासाठी गेले. यावेळी पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओमधून आलेल्या तीन जणांनी हा भलामोठा ट्रक लंपास केला आहे. हा प्रकार घडल्यानंतर स्कार्पिओ नंबर प्लेटच्या आधारावर पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
Web Title: Shrigonda truck disappeared while three vagrants were urinating