माजी सैनिकाच्या घरावर भरदिवसा दरोडा, १५ तोळे सोने व पिस्तुल लंपास
Shrigonda Theft | श्रीगोंदे: श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी वांगदरी रोडवर राहणारे माजी सैनिक जालिंदर रामदास पाचपुते (वय ४८) यांच्या घरावर भर दिवसा दरोडा टाकण्याची घटना घडली आहे. भर दुपारी दरवाजा तोडून चोरट्यानी घराच्या कपाटातील सुमारे १५ तोळे सोने व पिस्तुल लंपास केला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील काष्टी( लहारेपट) येथे शुक्रवारी भर दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास सेवानिवृत्त माजी सैनिक जालिंदर पाचपुते हे गावचा आठवडे बाजार व शिवजयंती असल्यामुळे गावात बाजारासाठी गेलेले होते. घरातील महिला शेतातील काम करण्यासाठी शेतावर गेल्या असताना घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्याने घराच्या दरवाजे व कुलपे कटावणीने तोडून कपाटातील पंधरा तोळे सोने व निवृत्तीनंतर स्वतःच्या संरक्षणासाठी घेतलेले पिस्तूल चोरीला गेल्याने गावात एकच खळबळ उडाली.
घटनेनंतर जालिंदर यांचे बंधू ग्रामपंचायत सदस्य मेजर चांगदेव पाचपुते यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. यावेळी पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पहाणी व पंचनामा केला. श्रीगोंदे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असुन अधिक तपास पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
Web Title: Shrigonda Theft robbery at ex-soldier’s house