Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यात दोन महिन्यात वाढती संख्या, सात जनता कर्फू
श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यात ८० गावांमध्ये करोनाचा शिरकाव झाला आहे. तरुण बाधित होण्याची संख्या अधिक आहे. करोनाने आत्तापर्यंत २८ जणांचा बळी घेतला आहे. तालुक्यात एकूण करोनाबाधितांची संख्या १ हजार १२७ इतकी झाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. मागील दहा दिवसांत ३०० नवे रुग्णांची वाढ झाली आहे. शहरात मागील दहा दिवसांत ७४ रुग्ण वाढले आहे. आत्तापर्यंत ४६५१ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये १ हजार १२७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये ९८० करोनामुक्त झाले आहे. सध्या १२० रुग्ण उपचार घेत आहेत.
करोना संकटाचा जे टेन्शन मुक्त सामना करतात ते करोनावर मात करतात केवळ भीतीमुळे ते करोनाचे शिकार ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता करोनाचा सामना करण्याची गरज आहे असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर म्हंटले आहे.
करोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यात सोमवारपासून सात दिवस जनता कर्फू लागू करण्यात येणार आहे. तसा निर्णय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
See: Latest Entertainment News and Latest Marathi News
Web Title: Shrigonda Taluka Increased Corona patient