Home अहमदनगर Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यात महिलेचा करोनाने मृत्यू

Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यात महिलेचा करोनाने मृत्यू

Shrigonda taluka coronavirus ladies death

श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यात उक्खलगाव येथे ५३ वर्षीय महिलेचा सोमवारी सुपा येथे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तालुक्यात करोनाचा तिसरा मृत्यू झाला आहे. यामुळे व्यापारी तालुका असोशीयनने तीन दिवस शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीगोंदा तालुक्यात करोनाबाधितांची संख्या दोनशेपार गेली आहे. एकट्या शहरातच ५३ करोनाबाधित आढळून आले आहेत. सोमवारी महिलेच्या संपर्कातील दहा व्यक्तींची करोना टेस्ट करण्यात आली. यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप त्या महिलेचा पती, मुलगा, वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या कुटुंबातील पाच व्यक्तींचे तपासणी करणे बाकी आहे.

व्यापारी व पदाधिकारी यांनी शहर तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आये. नागरिकांनी स्वयंस्पुर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Shrigonda taluka coronavirus ladies death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here