लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर कारमध्ये बलात्कार
अहमदनगर: श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील १९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत मित्राच्या मदतीने शहापूर तालुक्यातील धसई या गावाजवळ नेऊन बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी सोमवारी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात वैभव बाळू खामकर व निलेश गायकवाड रा. निंबवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील मुख्य आरोपी वैभव खामकर याला अटक केली असून दुसरा आरोपी निलेश गायकवाड हा पसार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील एका १९ वर्षीय दलित तरुणीला गावातीलच वैभव खामकर या तरुणाने मी तुझ्यासोबत लग्न करतो असे म्हणून २५ जानेवारी ला रात्री दीड वाजेच्या सुमारास पिंपळगाव पिसा येथून निलेश गायकवाड या मित्राच्या मदतीने गाडीतून घेऊन गेला. दिनांक २७ जाने. रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शहापूर तालुक्यातील यसई गावाजवळ गाडीमध्ये लग्नाचे आमिष दाखवून जबरी संभोग केला.
याप्रकरणी पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांच्या विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू खामकर यास अटक करण्यात आली आहे.
Web Title: Shrigonda Rape of a young woman in a car