वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा, एक महिला व तरुणाला अटक
श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा शहरामध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यावसायावर पोलिसांनी छापा टाकला आहे. यामध्ये एका तरुणाला व एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.
शहरात काही दिवसांपासून सुरु असलेल्या वेश्या व्यावसायावर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना गुप्त खबरीद्वारे माहिती मिळाली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास छापा टाकून कारवाई करण्यात आली. तेथे अवैध वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांना अडकवून, वेश्या गमनाकरीता प्रवृत्त करून अवैधरीत्या कुंटणखाना चालविताना एक ४८ वर्षीय महिला तसेच ग्राहक म्हणून गेलेल्या २७ वर्षीय अरुण देवकर या तरुणाला ताब्यात घेतले.
हा व्यवसाय चालविण्यासाठी लागणारे निरोध पाकिटे, २ हजार ५०० रुपये रोख रक्कम, मोबाईल इत्यादी माल जप्त करण्यात आला.
महिला पोलीस कर्मचारी गीतांजली लाड यांच्या फिर्यादीवरून २७ वर्षीय तरुण अरुण देवकर व ४८ वर्षीय महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे करीत आहेत.
Web Title: Shrigonda Police raid prostitution business
कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436