Home श्रीगोंदा  श्रीगोंदा उपकारागृहातील ३६ कैद्यांना करोनाची लागण, नगरला हलविले

 श्रीगोंदा उपकारागृहातील ३६ कैद्यांना करोनाची लागण, नगरला हलविले

Shrigonda Coronary infections in 36 inmates

श्रीगोंदा | shrigonda: श्रीगोंदा उपकारागृहातील कोठडीत असलेल्या ५५ आरोपीपैकी ३६ आरोपींना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामधील दोन आरोपींना जामिनावर मुक्तता केली आहे. तर ३४ आरोपी नगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, श्रीगोंदा उपकारागृहातील कोठडीतील काही आरोपींना ताप आला. त्यामुळे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सर्व आरोपींची करोना तपासणी करण्यास वैद्यकीय पथकास सांगितले. त्याप्रमाणे रविवारी ५५ आरोपींची करोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ३६ आरोपींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले.

यामध्ये जामिनावर दोन आरोपींची मुक्तता करण्यात आली असून श्रीगोंदा येथील कोविड सेंटरमध्ये यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. तसेच ३४ आरोपी यांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे. या आरोपींच्या संपर्कात असलेले पोलीस कर्मचारी व जेवण पुरविणारे कर्मचारी यांची देखील करोना चाचणी करण्यात येणार आहे. या सर्व आरोपींना नुकतीच करोना लागण झाली असल्याने त्यांची प्रकृती ठीक आहे असे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Shrigonda Coronary infections in 36 inmates

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here