विवाहित महिलेचा विनयभंग करणाऱ्या नराधमास अटक
श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेचा विनयभंग करणाऱ्या नराधमास श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. संतोष बबन सूर्यवंशी वय ३८ रा. आढळगाव असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक विकास वैराळ यांनी त्यास अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास संतोष याने २२ वर्षीय तरुण विवाहितेवर घरात घुसून विनयभंग केला. या पिडीत विवाहित महिलेने आरडाओरडा करत आपली सुटका करून घेत तिने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.
पोलीस नाईक विकास वैराळ यांनी २४ तासांत आरोपीला अटक केली व न्यायालयात दोषोरोपपत्र दाखल केले आहे. केवळ २४ तासांत वैराळ व महादेव काळे यांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केल्याबद्धल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
Web Title: Shrigonda arrested for molesting a married woman