मयत व्यक्तीच्या नावावरील साडे चार एकर जमीन हडपली, गुन्हा दाखल
श्रीगोंदा | Shrigonda: सारोळा सोमवंशी येथील जमीन हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. झाकीर हुसेन उलडे या मयत व्यक्तीच्या नावावरील साडे चार एकर जमीन आठ जणांनी हडपली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलगा शबनम जाकीर हुसेन उलडे रा. जनकवाडी पुणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून नामदेव सुपेकर रा. जनकवाडी पुणे, रहीम अकबर शेख रा. शिरूर, देवदत्त पोपट अरवडे रा. श्रीगोंदा, रितेश प्रेम प्रशद वाजपेयी, नागवेनी रितेश वाजपेयी रा. हैद्राबाद, अजित देवाराव पठारे रा. शिरूर, प्रवीण अंबादास आढाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीचे वडील जाकीर हुसेन उलडे यांच्या नवे सारोळा सोमवंशी, येथे साडे चार एकर शेतजमीन आहे. १ मार्च २००६ मध्ये जाकीर हुसेन यांचे निधन झाले आहे. असे असले तरी शेतजमीन ही त्यांच्याच नावे होती. उलडे कुटुंबीय पुण्यावरून जाऊन येऊन शेतजमीन करत होते. लॉकडाऊनच्या काळात ते सारोळा सोमवंशी येथे येऊ शकले नाही.
ऑक्टोबर महिन्यामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी सात बारा उतारयाची गरज भासल्याने त्यांनी उतारा काढला. या उतार्यात इतर व्यक्तींची नावे येऊन जाकीर हुसेन यांच्या नावाला कंस लागल्याचे दिसून आले. त्यामुळे हा बोगस खरेदी खताचा प्रकार समोर आला.
Web Title: Shrigonda and in the name of the deceased was seized