अहमदनगर ब्रेकिंग: भिंत अंगावर पडून दोन महिलांचा मृत्यू
श्रीगोंदा | Shrigonda: पाण्याची टाकी फुटून भिंत अंगावर कोसळल्यामुळे महिला व तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, लोणी व्यंकनाथ गावचे शिवारात कांडेकर वस्ती, ता. श्रीगोंदा येथे ही दुर्दैवी घटना शनिवारी रोजी दोन वाजेच्या सुमारास घडली.
या अपघातात (Accident) मथुरा नामदेव पागी (वय 26 वर्षे, रा. बाफनविहीर, पोस्ट देवडोंगरा, ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक) व सुशिला नामदेव डाडर (वय 17 वर्षे, रा. कहांडोळपडा, पो. भुवन, ता. पेठ, जि. नाशिक) या दोन शेतमजुरी करणाऱ्या महिला व मुलीचा करून अंत झाला असून यशोदाबाई मनोहर भोसले, (वय 21 वर्षे, रा. बाफनविहीर, पोस्ट देवडोंगरा, ता. त्रिंबकेश्वर जि. नाशिक) ही महिला या दुर्घटनेत जखमी झाली आहे.
या घटनेबाबत नामदेव मंगळु पागी यांच्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मयत मुलगी, मयत महिला व जखमी महिला (Injured Woman) या तीघीजणी घटना घडलेल्या ठिकाणी शेतात पाण्याच्या टाकीजवळ कपडे धूत असताना टाकी फुटून पाण्याच्या टाकीची भिंत या महिलांच्या अंगावर कोसळली त्यात गंभीर मार लागल्यामुळे शेतमजुरी करणारी एक मुलगी व महिला यात मयत पावल्या तर एक महिला गंभीर जखमी झाली. सदर मयत मुलगी व महिला या मजुरीच्या कामासाठी लोणीव्यंकनाथ येथे आल्या होत्या त्यात त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
Web Title: Shrigonda Accident Two women die after falling on wall