गर्भसंस्कार आणि पालकत्व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन, अकोले
गर्भसंस्कार आणि पालकत्व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन, अकोले:
अकोले प्रतिनिधी –
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अकोले यांचे वतीने रविवार दि.३ जून रोजी सकाळी ११.०० वाजता बालसंस्कार, युवा प्रबोधन व विवाह संस्कार विभागांतर्गत गर्भसंस्कार आणि पालकत्व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन प.पू.गुरूमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे आशिर्वादा ने करण्यात आल्याची माहिती संजय हुजबंद यांनी दिली. या शिबीराचे उद्घाटन तालुक्याचे आ.वैभवराव पिचड यांच्या शुभहस्ते होणार आहे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अकोले नगरपंचायतच्या प्रथम महिला नगराध्यक्षा सौ.संगीता अविनाश शेटे ह्या भुषविणार आहेत.
श्री हुजबंद पुढे म्हणाले की, या शिबीरामध्ये गर्भसंस्कार, सुयोग्य बाल्यावस्था ते रजस्व परिचर्या, मनोवांछीत संततीसाठी गर्भधारणापूर्व तयारी, गर्भावस्थेतील आरोग्य विषयक महत्वपूर्ण बाबीवर प्रकाश, सुलभ प्रसुती तंत्र, नवजात बालकाचे संगोपन, संततीचा विकास, विविध विधी व सेवा या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच गर्भसंस्कार, पालकत्व व युवा प्रबोधन या विषयावर सखोल मार्गदर्शन तथा समुपदेशन करण्यासाठी गुरुकुलपीठ त्र्यंबकेश्वर येथील तज्ञ, डॉक्टर प्रतिनिधी येणार आहेत. या शिबीरासाठी तालुक्यातील महिला , आशा सेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. तरी या शिबीराचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन श्री स्वामी सेवा केंद्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.
संगमनेर अकोले न्यूज अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.