गणपतीच्या डेकोरेशनमध्ये शॉर्ट सर्किट; घरातल्या कर्त्या पुरुषाचा होरपळून मृत्यू
गणपतीसाठी केलेल्या सजावटीसाठी केलेल्या विद्युत रोषणाईमुळे एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू (Death) झाल्याची घटना.
पुणे : गणेशोत्सवात पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गणपतीसाठी केलेल्या सजावटीसाठी केलेल्या विद्युत रोषणाईमुळे एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गणेशोत्सवानिमित्त करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने शॉक लागून गणेशभक्ताचा रात्री झोपेत असतानाच होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
खेड तालुक्यातील खरपुडीत घरगुती गणपती सजवटीच्या विद्युत रोषणाईत शॉटसर्किट झाल्याने शॉक लागून तरुणाचा रात्रीच्या झोपेत होरपळून मृत्यू झाला. खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. वैभव जगन्नाथ गरुड (वय 35 ) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत खेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, , खरपुडी येथील दत्तनगरमध्ये मयत वैभव गरुड हे कुंटुंबासह राहत होते. गरुड यांनी घरात गणपती बसवून मूर्तीसमोर आकर्षक सजावट केली होती. या सजावटीमध्ये इलेक्ट्रिक लाईटच्या माळा लावण्यात आल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात लावलेल्या इलेक्ट्रिक लाईटच्या माळांमध्ये शॉटसर्कीट होऊन आग लागली. काहीवेळातच घरात आग वेगाने पसरली. काही कळण्याचा आतच आगीने रौद्ररुप धारण केले. घरातील साड्या व इतर वस्तू जळून खाक झाल्या. त्यावेळी गादीवर झोपलेल्या वैभव गरुड यांचा जळून मूत्यू झाला.
त्याचा अशाप्रकारने मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Short circuit in Ganapati’s decoration Death of a house worker
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App