Home राहाता Shirdi: शिर्डीत एका दुकानदाराचा चाकूने केला खून

Shirdi: शिर्डीत एका दुकानदाराचा चाकूने केला खून

shopkeeper was stabbed to death in Shirdi

शिर्डी | Shirdi: शिर्डी येथील निमगाव हद्दीत देशमुख चारीजवळ राहत असलेल्या किराणा दुकानदाराचा मानेवर चाकूने वार करीत खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी ११ जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यामधील ५ जणांना ताब्यात घेतले आहे.

शिर्डी येथील शासकीय गेस्ट हाउस समोरील देशमुख चारी येथे निमगाव हद्दीत रवींद्र साहेबराव माळी यांचे व आरोपी यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाची तक्रार शिर्डी पोलीस स्टेशला माळी यांनी केली होती. याच गोष्टीचा मनात राग धरून अजय वैजनाथ भांगे, विशाल रमेश पाटील, रवींद्र बनसोडे, समीर शेख, अज्जू पठान, रंजना वैजनाथ भांगे, ललिता रमेश पाटील, सुनील लोखंडे, अक्षय शिंदे, महेश गायकवाड, कुणाल जगताप यांनी गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास देशमुख चारी जवळ माळी यास पकडून खून केला.

ही घटना समजताच पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे हे घटनास्थळी दाखल झाले. तातडीने त्यांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.

Web Title: shopkeeper was stabbed to death in Shirdi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here