संगमनेर तालुक्यात दुकान फोडले, मुद्देमाल लंपास
Sangamner Crime: जांभूळवाडी येथे बंद किराणा दुकानाचे कुलूप तोडत शटर उचकटून रोख रकमेसह तेल डबे व साखरेचे कट्टे असा एकूण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील चोरीचे सत्र सुरूच आहे. जांभूळवाडी येथे बंद किराणा दुकानाचे कुलूप तोडत शटर उचकटून रोख रकमेसह तेल डबे व साखरेचे कट्टे असा एकूण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. शनिवारी (दि. ११) रात्री अकरा ते रविवारी (दि. १२) पहाटे चारच्या दरम्यान हा प्रकार घडला.
याबाबत दादाभाऊ विठोबा माने (वय ३३, रा. जांभूळवाडी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढत्या महागाईमुळेच की काय चोरट्यांनी आता आपला मोर्चा थेट किराणा दुकानांकडे वळवला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दादाभाऊ माने यांचे जांभूळवाडी येथे बाळुमामा किराणा व जनरल स्टोअर्स हे किराणा माल विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री अकरा ते रविवारी पहाटे चार या दरम्यान चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडत शटर उचकटून आत प्रवेश केला. यानंतर गल्ल्यातील ९ हजारांची रोख रक्कम, दुकानातील तेलाचे १५ लिटरचे २ डबे, १० लिटरचे १७ बॉक्स, ५० किलोचे ३ साखरेचे कट्टे असा एकूण ३६ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या चोरीचा अधिक तपास पोलिस नाईक बी. वाय. गोडे करत आहेत.
Web Title: shop was broken into in Sangamner taluka, goods theft
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App