Home क्राईम मैत्रिणीचे अपहरण करून तिची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना

मैत्रिणीचे अपहरण करून तिची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना

Pimpari Crime News:  मैत्रिण बेपत्ता (kidnapping) झाल्याची तक्रार, तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण केले. त्यानंतर तिची विल्हेवाट लावल्याचे समोर आले.

shocking incident of kidnapping and disposing of a friend

पिंपरी :  चिचंवडमधील एका वेबपोर्टलच्या पत्रकाराने दोन दिवसांपूर्वी भोसरी पोलीस त्याची मैत्रिण बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. मात्र,  आज त्याच्याकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक कारण समोर आले आहे. आरोपीने तिच्यापासून सुटका करण्यासाठी तीला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण केले. त्यानंतर तिची विल्हेवाट लावल्याचे समोर आले आहे. हा प्रकार 3 ऑगस्ट 2022 रोजी घडला असून याप्रकरणी शनिवारी (दि. 5) गुन्हा दाखल करून  अटक करण्यात आली आहे.

चंद्रमा सिमांचल (वय-28 रा. ओडिशा) असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी रामदास पोपट तांबे (वय-30 रा. दिघी रोड, भोसरी, मुळ रा. तांबेवाडी, टाकळी मानुर, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपी पत्रकाराचे नाव आहे. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक लक्ष्मण गोविंद डामसे (वय-37) यांनी फिर्याद दिली आहे..

तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रमा हिने तिच्या वडिलांच्या नावावर असलेल्या दोन घरांपैकी एक घर तिच्या नावावर करून द्यावे, तसेच पैसे आणि दागिनेही द्यावे अशी मागणी केली. त्यासाठी तिने आरोपीच्या नावाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. आरोपीला ते पटत नसल्याने त्यांच्यात वाद वाढले. जर आरोपीने तिला साथ दिली नाही तर ती त्याला लैंगिक अत्याचाराच्या (Sexual Abuse) गुन्ह्यात अडकवणार, अशी धमकी तिने दिली. तिच्यापासून कायमची सुटका करून घेण्यासाठी त्याने तरुणीला जीवे मारण्याच्या उद्देशाने भोसरी मधून खेड तालुक्यातील केळगाव येथे नेले तिथे नदी पात्रात तिची विल्हेवाट लावली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: shocking incident of kidnapping and disposing of a friend

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here