Home संगमनेर संगमनेरमध्ये शिवसेनेची ताकद आणखी वाढली, इंकामिग सुरूच

संगमनेरमध्ये शिवसेनेची ताकद आणखी वाढली, इंकामिग सुरूच

Breaking News | Sangamner Politics: संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये अनेक युवक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहे.

Shiv Sena's strength has increased further in Sangamner

संगमनेर : गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. नेते, कार्यकर्ते-पदाधिकारी पक्षांतर करताना दिसत आहे. असे असताना संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये अनेक युवक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहे. तालुक्यात युवाशक्ती भगव्या खाली एकवटत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे, असे आमदार अमोल खताळ यांनी केले.

संगमनेर येथे नुकतीच शिवसेनेची युवक निर्धार बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शशिकांत (लाला) दायमा, अजित भारते, अनिरुद्ध वाल झाडे, ओंकार शिंदे यांच्यासह अन्य ५० ते ६० युवक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आमदार खताळ म्हणाले, काही दिवसांपूर्वी संगमनेर खुर्द येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या पाठोपाठ विविध गावातील शहराच्या विविध उपनगरातील युवक कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे. येथून पुढील काळातही अनेक युवक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

लवकरच शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमनेर कार्यक्रम होणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यात केंद्रात आणि राज्यात मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर भाजपचे सरकार सत्तेत आहे. या निवडणुका पार पडल्यानंतरही भाजपमध्ये नेतेमंडळींचे इन्कमिंग अद्याप थांबलेले नाही. असे असताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे बंधू आणि माजी आमदार पंडीत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता शिवसेनेत इन्कमिंग होत आहे. आता अनेक तरुणांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

Breaking News: Shiv Sena’s strength has increased further in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here