न्यायालयाच्या आवारातच पतीने पत्नी व सासूवर झाडल्या गोळ्या, पत्नी ठार
Shirur Firing | शिरूर: शिरूर न्यायालयाच्या परिसरात पतीने पत्नी व सासूला पिस्तुलातून गोळ्या झाडल्याची (Firing) धक्कादायक घटना आज मंगळवार रोजी घडली. या गोळीबारात पत्नीचा मृत्यू झाला तर सासू गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरूर न्यायालयात झावरे व ढवळे कुटुंब पोटगी केसच्या संदर्भात आले होते. दीपक ढवळे व मंजुळा ढवळे या पती पत्नीची केस न्यायालयात सुरु होती. या दोन्ही कुटुंबात वाद होऊन शाब्दिक चकमक झाली.
मंजुळा दीपक ढवळे रा. वाडेगव्हाण ता. पारनेर यांना गोळी लागून जागीच ठार झाल्या तर सासू तुळसाबाई रंगनाथ झावरे वय ५५ या जखमी झाल्या आहे.
न्यायालयात केसच्या सुनावणीसाठी आलेला दीपक ढवळे याने त्याच्या भावाच्या मदतीने बायको व सासूवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला आहे. सासूवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना तातडीने पाठलाग करीत ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करीत आहे.
Web Title: Shirur Firing Husband shoots wife and mother-in-law in court