शिर्डीत चोरी, साडे तीन किलो सोने आणि चार लाख लंपास
Breaking News | Shirdi: सव्वा तीन कोटींचे सोने : मुंबईतील व्यापाऱ्याला राजस्थानी चालकाचा गंडा.
शिर्डी : येथे एका हॉटेलमधून तब्बल ३ कोटी २६ लाख रुपयांचे सुमारे साडेतीन किलो वजनाचे सोने आणि रोकड चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोन्याचे व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी (वय ३५, रा. आवाल घुमटी, गुजरात) यांनी फिर्याद दिली आहे.
आपला चालक सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित (रा. चौहटन, राजस्थान) याच्यावरच खिशी यांनी संशय व्यक्त केला आहे. खिशी हे मुंबईतील त्यांच्या होलसेल सोन्याच्या फर्ममधून सुमारे ४ किलो ८७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन ७ मे रोजी शिर्डीत आले होते. त्यांच्यासोबत कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि चालक सुरेश कुमार होते. ते हॉटेल साई सुनीताच्या रूम नंबर २०१ मध्ये मुक्कामी होते. खिशी हे अहिल्यानगर ते मनमाडपर्यंत विविध सराफ दुकानांमध्ये सोने विक्रीसाठी जात होते. दिवसभर फिरल्यानंतर रात्री हॉटेलमध्ये परत मुक्कामी येत होते. १३ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जेवण करून ते रूममध्ये झोपले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग रुममध्ये बेड आणि टेबलच्या मध्ये ठेवलेली होती. रूम आतून लॉक होती. मालक व दोघे कामगार एकाच रुममध्ये थांबले होते.
१४ मे रोजी सकाळी ६ वाजता खिशी यांचा चुलत भाऊ शैलेंद्रसिंह हा त्यांच्याकडील पेमेंट घेण्यासाठी हॉटेलवर आला. त्याने रूमचा दरवाजा उघडला असता तो उघडा होता. आत पाहिले असता, चालक सुरेश कुमार रूममध्ये नव्हता. त्याचा मोबाइल फोन आणि कपडे रूममध्येच होते. हॉटेल आणि मंदिर परिसरात शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यानंतर खिशी यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग तपासली असता, त्यातील सुमारे ३.५ किलो वजनाचे ३ कोटी २२ लाख रुपये किमतीचे विविध सोन्याचे दागिने आणि ४ लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर, तुषार धाकराव, शिर्डीचे पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवांत जाधव हे अधिक तपास करीत आहेत.
दोन महिन्यांची ओळख
खिशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक सुरेश कुमार हा त्यांच्याकडे दोन महिन्यांपासून कामाला होता. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याने आपला विश्वासघात करून चोरी केल्याची त्यांची तक्रार आहे. चालक आपला मोबाइल रुममध्येच ठेवून पसार झाला आहे. नगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी शिर्डीला गेले आहे.
२२ लाख रुपये किमतीचे विविध सोन्याचे दागिने आणि ४ लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे आढळून आले.
Breaking News: Shirdit theft, three and a half kilos of gold and four lakh rupees