शिर्डीला जाणाऱ्या बसचा अपघात, १० साईभक्तांचा मृत्यू – Bus Truck Accident
Sinnar Shirdi Bus Accident: नाशिक-सिन्नर शिर्डी मार्गावरुन जात असताना पाथरेजवळ बस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला. पाथरेजवळ भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
सिन्नर-शिर्डी महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. पाथरे गावानजीक हॉटेल वनराई जवळ खासगी आराम बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे. अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे…
सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे गावानजीक हॉटेल वनराईच्या जवळ बस क्रमांक MH 04 SK 2751 व मालवाहतूक ट्रक क्रमांक MH 48 T 1295 यांच्या समोरासमोर अपघात होऊन 11 मृत्युमुखी पडले आहेत,
३५ जण गंभीर जखमी आहेत. ठाणे अंबरनाथ परिसरातून सदर बस शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येत असताना वावी पाथरे दरम्यान टोल नाक्याच्या पुढे एकेरी वाहतूक असल्याने हा अपघात समोरासमोर झाल्याचे समजते.
यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना शवविच्छेदनासाठी सिन्नर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
जखमींना नाशिक, सिन्नर अशा ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे. दरम्यान मृतांची नाव अद्याप पर्यंत समजू शकले नाही.
मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खासगी बस आणि शिर्डीकडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालवाहू ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन आपघात झाला. पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाके दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते. उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला आहे. दरम्यान, अपघातात बसचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. वावी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरु आहे.
Web Title: Shirdi-bound bus truck accident, 10 Sai devotees killed
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App