‘ती’ म्हणाली, लग्न कर; नकार देताच युवकाचा खून
Hingoli Crime: लग्न करीत नसल्याने सोबत राहणाऱ्या युवकाचा तृतीयपंथीयाने अन्य एकाच्या मदतीने खून (Murder) केल्याची घटना.
हिंगोली : लग्न करीत नसल्याने सोबत राहणाऱ्या युवकाचा तृतीयपंथीयाने अन्य एकाच्या मदतीने खून केल्याची घटना हिंगोलीतील खुशालनगर भागात उघडकीस आली आहे. अशोक गजानन आठवले (२३) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तो मागील काही वर्षांपासून शहरात ऑटो चालवण्याचा व्यवसाय करीत होता. यातच त्याची ओळख खुशालनगर भागातील प्रिया ऊर्फ दीपक नरसिंग तुरमळू या तृतीयपंथीयासोबत झाली. तीन महिन्यांपूर्वी तो प्रियाच्या घरी राहायला आला. प्रियाने अशोकला लग्नासाठी गळ घातली. अशोक मात्र या नात्याला कोणतेही भवितव्य नसल्याचे सांगून प्रियाला टाळत होता. यावरून गुरुवारी त्या दोघांमध्ये खडाजंगी झाली. प्रियाने रात्री हरण चौक भागात राहणाऱ्या शेख जावेद शेख ताहिर कुरेशी याला बोलावून घेतले. त्यांनी अशोकचा गळा आवळून त्याला जिवे मारले. त्यानंतर अशोकने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, अशोकचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत मयताचा भाऊ देवीदास आठवले यांच्या तक्रारीवरून प्रिया व शेख जावेद या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: She said, marry The youth was Murder when he refused
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App