‘ती’ने नकार देताच स्वत:वर ब्लेडने वार ‘व्हॅलेंटाइन डे’च्या …..
Breaking News | Pune Crime: अल्पवयीन मुलीने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका २४ वर्षीय युवकाने स्वतःच्या हातावर ब्लेडने मारून घेऊन स्वतःला जखमी केले.
पुणे : ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलीने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका २४ वर्षीय युवकाने स्वतःच्या हातावर ब्लेडने मारून घेऊन स्वतःला जखमी केले. भारती विद्यापीठ पोलिसांनी युवराज रवींद्र बारडे (२४, रा. पर्वती दर्शन) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दत्तनगर परिसरातील १६ वर्षांच्या तरुणीने तक्रार दिली आहे. हा प्रकार फिर्यादी मुलीच्या राहत्या घरी मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवराज याने फिर्यादी मुलीशी २०२३ पासून मैत्री करून तिच्याशी जवळीक वाढवली. तू आवडतेस. माझ्याशी संबंध नाही ठेवले तर मी माझे बरे वाईट करून घेईन, अशी धमकी तो वारंवार देत होता. तिचा पाठलाग करून तो तिच्या घरी आला. तिने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने स्वतःला ब्लेडने मारून घेत जखमी केले. पोलिसांनी त्याच्या विरोधात ‘पॉक्सो’ व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: she refused, she stabbed herself with a blade on Valentine’s Day.
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study