शहापुरात खडडयांनी घेतला दोन बालकांचा बळी
शहापुर : मुंबई – नाशिक महामार्गावरील शहापुरजवळील आसनगाव येथे खडडयांमुळे दुचाकी अपघातात दोन सख्खा भावडांना जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात या भावडांचे आई, वडील गंभीर जखमी झाले. शहापुर तालुक्यातील आवरे गावातील प्रकाश बरकु घरत हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांना घेऊन मुंबई -नाशिक महामार्गावरुन दुचाकीवरुन प्रवास करत होते.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
मुंबई – नाशिक महामार्गावर पडलेले खडडे चुकवत असताना त्यांची दुचाकी खडडयात आपटल्याने पती पत्नी रस्त्याच्या बाजुला फेकले गेले, तर रस्त्याच्या मधोमध पडल्याने सचिन (१०), कामिनी (१५) , या दोन्ही बालकांचा पाठीमागुन येणारे भरधाव वाहन अंगावरुन गेल्याने जागीच मृत्यु झाला. दुचाकी चालक प्रकाश घरत त्यांची पत्नी रेखा घरत गंभीर जखमी झाले आहेत.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.