प्रेयसीवर अत्याचार करुन फोटो काढून ब्लॅकमेल करीत सोनेही लुटले
Ahmednagar Crime: प्रेम व नंतर भेटीचे फोटो काढून ब्लॅकमेल करीत धमकीचा वापर करुन लैंगिक अत्याचार (sexually abused) केल्याची घटना.

सोनई: नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील तरुणाने एका मुलीशी ओळख वाढवून प्रेम व नंतर भेटीचे फोटो काढून ब्लॅकमेल करीत धमकीचा वापर करुन लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी फिर्याद दाखल होताच सोनई पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
निखील बाबासाहेब गायकवाड (वय 23) रा. घोडेगाव याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तरुणीने घाबरुन धमकी देणार्या तरुणास दिलेल्या 21 तोळे सोन्यापैकी विकलेले साडेअकरा तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी सोनई, घोडेगाव व राहुरी येथील सराफांच्या दुकानातून हस्तगत केले आहे.
Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी
पिडीत मुलीने घडलेला सर्व प्रकार पोलीस ठाण्यात कथन केला असून बरोबर काढलेले फोटो इतरांना देण्याची धमकी देवून वेळोवेळी सोन्याचे दागिने व पैशाची मागणी करुन त्रास दिला. लैंगिक अत्याचार व धमकी देवून मानसिक, शारीरिक छळ केला असे फिर्यादीत नमूद केल्यानंतर पोलिसांनी घोडेगाव येथील निखील बाबासाहेब गायकवाड (वय 23) याच्या विरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 12/ 2023 भारतीय दंड विधान कलम 376, 384, 354, 506 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
Web Title: Sexually abused the girlfriend, taking pictures, blackmailing and stealing gold
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

















































