Home नागपूर नात्याला काळिमा फासणारी घटना: आजोबाकडूनच अल्पवयीन नातीचा लैंगिक छळ

नात्याला काळिमा फासणारी घटना: आजोबाकडूनच अल्पवयीन नातीचा लैंगिक छळ

Sexual harassment of a minor by a grandfather

Nagpur Crime | नागपूर: नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या दोन घटना समोर आल्या आहेत. यामध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना नागपूरला हादरवणारी आहे. १३ वर्षीय मुलीचा तिच्या आजोबांनी लैंगिक(Sexual harassment ) छळ केल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई गर्भवती असल्याने ती सध्या आपल्या माहेरी आली होती. ती गर्भवती असल्यामुळे मुलीला आजोबांकडे झोपायला पाठवत होती. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या आईने आजोबा आणि नात दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर कुटुंबात या विषयावर चर्चा झाली. मात्र, कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने पीडितेच्या आईला सर्वांनी गप्प ठेवले. हे प्रकरण उघडकीस आणले नाही मात्र अखेरीस पीडितेने आणि तिच्या आईने पोलीस तक्रार देण्याचे निर्णय घेतला.

त्यानंतर सोमवारी (6 जून) कपिलनगर पोलीस स्टेशनमध्ये पीडितेच्या आजोबाविरोधात पॉक्सो आणि आयपीसीच्या कलम 376 अन्वये बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनने खळबळ उडाली आहे.

Web Title: Sexual harassment of a minor by a grandfather

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here