Breaking News | Woman Doctor abused: डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस, बदनामीची भीती दाखवून एक कोटी उकळले.
अंधेरी: एका डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बदनामीची भीती दाखवून तिच्याच विवाहित प्रियकराने तिच्याकडून आतापर्यंत एक कोटी रुपये उकळल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी अवैझ ताझिम अहमद या प्रियकराविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (ता. २१) फसवणुकीसह लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार महिला ही कुर्ला येथे राहत असून ती व्यवसायाने डॉक्टर आहे. दोन वर्षांपूर्वी तिची सोशल मीडियावरून अवैझ याच्याशी मैत्री झाली होती. मैत्रीनंतर त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. ती विवाहित असून एक मुलगी असल्याचे त्याला माहीत होती. लग्नानंतर या दोघांचा सांभाळ करण्याचे त्याने तिला आश्वासन दिले होते. लग्नाच्या भूलथापा देऊन त्याने तिच्यावर अनेकदा अंधेरीतील एअरपोर्टजवळील एका हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केले होते. काही महिने सर्व सुरळीत सुरू असताना तो तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत होता. उधारी घेतलेले पैसे तो तिला परत करणार असल्याचे सांगत होता; मात्र त्याने तिला कधीच पैसे परत केले नाही. त्यामुळे तिने त्याला पैसे देणे बंद केले होते. याच कारणावरून त्यांच्यात खटके उडू लागले आणि तो तिला मारहाण करू लागला. त्यानंतर दोघांच्या संबंधाविषयीची माहिती नातेवाईक, मित्रमंडळींना देण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होता. या धमकीनंतर त्याने तिच्याकडून एक कोटी रुपये उकळले होते. याचदरम्यान तिला अवैझ हा विवाहित असून त्याने केवळ शारीरिक संबंधासाठी तिचा वापर केल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
Web Title: Sexual assault on female doctor
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study