अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, होम गार्ड कर्मचाऱ्यास अटक
Breaking News | Ahmednagar: आईनंतर होमगार्डही आरोपीच्या पिंजऱ्यात.
राहुरी : सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार करणारा आरोपी विश्वास संतोष मकासरे यास मदत करणाऱ्या आईला अटक केल्यानंतर त्यात आता होमगार्डचे नाव समोर आले आहे. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
वैशाली संतोष मकासरे (४५) असे अटकेतील आईचे तर रमेश भास्कर मकासरे (२६, रा. चिंचोली फाटा, राहुरी) असे होमगार्डचे नाव आहे. मकासरे याने मुलीला पळवून नेण्यास मदत केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. राहुरी पोलिस ठाण्यामध्ये आरोपी विश्वास मकासरे (रा. संक्रापूर, राहुरी) याच्याविरोधात अल्पवयीन मुलीला लग्नाची फूस लावत पळवून नेल्याचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी ज्या होमगार्डला अटक केली तो नेहमीच पोलिसांना इतर कामात सहकार्य करत होता.
होमगार्ड रमेश मकासरे यास अटक केल्यानंतर आरोपी विश्वास मकासरे व पीडित मुलीला धुळे जिल्ह्यात पाठविल्याचे समोर आले आहे. पोलिस हवालदार शेळके व नदीम पठाण यांचे पथक दोघांच्या शोधासाठी रवाना झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.
Web Title: Sexual assault on a minor girl, home guard employee arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study