धक्कादायक! 11 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; घरात कोणी नसल्याचं पाहून आरोपीने…
Breaking News | Baramati Crime: घरात कुणीही नसल्याचं फायदा घेऊन एका 11 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला.
बारामती: बारामती तालुक्यातील मुर्टी येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका 11 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला आहे. सदर घटनेची माहीती मिळताच वरीष्ट अधिकारी, समाजसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, घरात कुणीही नसल्याचं फायदा घेऊन एका 11 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना बारामती तालुक्यातील मूर्टी येथे घडली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अण्णा किसन गोफणे (रा. मोराळवाडी, ता. बारामती) असं या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरात एकटी होती. त्यावेळी आरोपी अण्णा गोफणे याने जबरदस्तीने घरात प्रवेश करत या चिमुरडीवर अत्याचार केला. ही घटना समजल्यानंतर संबंधित पीडितेच्या कुटुंबीयांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
Breaking News: Sexual assault on 11-year-old girl; Seeing that no one was home, the accused