अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अन आरोपीस ….
अल्पवयीन मुलीवर घरी कोणी नसताना लैंगिक अत्याचार (Sexual abused) केल्याच्या प्रकरणात आरोपीस पोक्सो कायद्यानुसार शिक्षा.
परभणी : अल्पवयीन मुलीवर घरी कोणी नसताना लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपीस पोक्सो कायद्यानुसार २० वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परभणी जिल्हा व सत्र न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश- १ एस.एस. नायर यांनी गुरुवारी हा निकाल दिला.
जिल्ह्यातील सेलू ठाण्यात २२ मार्च २०२२ रोजी पीडित मुलीच्या आईने आरोपी वैभव बाबाराव कदम (रा. साईबाबानगर, परभणी, ह.मु. हमालवाडी, सेलू) याच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यावरून आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडितेची साक्ष तसेच वैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल महत्त्वपूर्ण ठरला.
सर्व साक्षीपुराव्यांचे अवलोकन करून न्यायालयाने गुरुवारी आरोपी वैभव कदम यास कलम ४ (२) पोक्सो कायद्यामध्ये वीस वर्षांचा सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरकारी अभियोक्ता आनंद गिराम यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली.
Web Title: Sexual abused on a minor girl, accused
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App