Home क्राईम भुलीचे इंजेक्शन देऊन अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, सिस्टर्सने इंजेक्शन देत..

भुलीचे इंजेक्शन देऊन अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, सिस्टर्सने इंजेक्शन देत..

Pune Crime: मुलासोबत अनैसर्गिक कृत्य (sexual abused) केल्याचा धक्कादायक प्रकार, मनोरुग्णालयात काम करणारे अनोळखी सिस्टर व चार गार्ड यांच्यावर गुन्हा दाखल.

Sexual abuse of a minor by injecting Bhuli

पुणे : एका गुन्ह्यात बालसुधारगृहात दाखल झालेल्या १६ वर्षीय मुलाला उपचारांसाठी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी आरोपीने संबंधित मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडिताला भुलीचे इंजेक्शन देऊन अत्याचारास मदत केल्याप्रकरणी नर्ससह पाचजणांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

याबाबत पीडित मुलाचे ४२ वर्षीय आईने आरोपींविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. हा प्रकार ३० में ते २६ जून २०२३ यादरम्यान येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  पीडित मुलाला खेड पोलिसांनी एका खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात येरवडा बालनिरीक्षणगृहात ठेवले होते. तेथून त्याला मनोरुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात बोले. त्याठिकाणी आरोपी अनिकेत गोखले (वय २५) याच्यावरदेखील उपचार करण्यात येत होते. अनिकेत गोखले याने या मुलावर रुग्णालयात वारंवार अनैसर्गिक संबंध ठेवले. तसेच कोणालाही हा प्रकार सांगायचा नाही अशी धमकी देण्यात आली.  धमकी दिली.

त्यानंतर बरॅकमध्ये अल्पवयीन मुलगा आराम करीत असतानाही मनोरुग्णालयात काम करणारे अनोळखी सिस्टर व चार गार्ड यांनी त्याला भुलीचे इंजेक्शन दिले. उपचारांनंतर पीडित मुलास रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या आईने त्याला शाळेत प्रवेश घेण्यासाठी कोल्हापूर येथे नेले. त्यावेळी त्याचा डावा हात सारखा दुखत असल्याचे तो सांगू लागला. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन त्याने तपासणी करीत, डॉक्टरांच्या सल्ल्याने हाताचा एक्स-रे काढला. त्यावेळी त्याच्या हाताला तब्बल १८ ठिकाणी सुया टोचल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रादेशिक रुग्णालयातील सिस्टर व चार गार्ड यांनी त्याला भुलीचे इंजेक्शन दिल्याने त्याच्या हाताला दुखापत झाल्याने आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास येरवडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गाताडे हे करीत आहेत.

Web Title: Sexual abuse of a minor by injecting Bhuli

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here