तृतीयपंथाकडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण
Breaking News | Nashik Crime: घरात बोलावून घेत एका तृतीय पंथीयाने अल्पवयीन मुलाचा लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार.
नाशिक : घरात बोलावून घेत एका तृतीय पंथीयाने अल्पवयीन मुलाचा लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुटूंबियांनी मुलास हुडकून काढत संशयितास जाब विचारल्याने संतप्त तृतीय पंथीयाने शिवीगाळ करीत बघून घेण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे.
पोलिसांनी संशयितास तात्काळ अटक केली असून याप्रकरणी बालकांचा लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तृतीय पंथीसारखा दिसणारा पिंटी नावाच्या संशयितास पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पिडीत मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार गुरूवारी (दि. १७) दुपारच्या सुमारास मुलगा खडकाळी भागात आईस्क्रिम खात आपल्या घराकडे जात असताना तृतीयपंथी सारख्या वावरणाऱ्या संशयित पिटीने मुलाची वाट अडूनत्याला घरात येण्याचा आग्रह केला. मुलाने नकार देताच त्याने भावाच्या स्कुल व्हॅनचा स्फोट होईल, असा शाप देण्याची धमकी देत मुलास आपल्या घरात नेले. बराच वेळ उलटूनही मुलगा घरी न आल्याने पिडीत मुलाच्या आईने शोधाशोध केली असताना हा प्रकार समोर आला. मुलाच्या आईने अन्य नातेवाईक असलेल्या दोन महिलांना सोबत घेत संशयितास जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करीत महिलांना बघून घेईल, अशी धमकी दिल्याने महिलांनी पोलीसांत धाव घेतली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहे.
Web Title: Sexual abuse of a minor by a third party
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study